खासदार प्रणिती शिंदे यांचा आंदोलनात सहभाग
नवी दिल्ली: गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात संसदेत एकेरी भाषेत आणि आंबेडकर या नावाला फॅशन असे संबोधून त्यांच्या नावाचा केला. वक्तव्याबद्दल अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी करत काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केले.
या आंदोलनात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी, खासदार प्रियांका गांधी, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस इंडिया आघाडीचे खासदार सहभागी झाले होते.