संजय आवटे, दत्ता देसाई, अजित अभ्यंकर, शमा दलवाई यांची उपस्थिती

सोलापूर (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताकाला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. देश आज अनेक समस्यांचा सामना करत आहे. प्रजात्ताकाचा अमृत महोत्सव साजरा करताना जनसांस्कृतिक परंपरेमधून, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून आणि प्रत्यक्ष अनुभवामधून साकारलेल्या मूल्यांच्या आधारे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात “भारत : काल आज उद्या’ याची मांडणी होण्याची नितांत आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेऊन ज्येष्ठ विचारवंत दत्ता देसाई यांनी’ बदलता भारत पारतंत्र्यातून महासत्तेकडे…’ हा दोन खंडातील महाग्रंथ महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रातील अभ्यासक, विचारवंतांची मोट बांधून संपादीत केला आहे. या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा समाजविज्ञान अकादमी, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे व प्रगतीशील लेखक संघ सोलापूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शिवछत्रपती रंगभवन येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती रविंद्र मोकाशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.