सोलापूर प्रतिनिधी –
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गुरुवारी सोलापुरात आहेत. त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा घेतला. या मेळाव्यामध्ये पोस्टरवर आपला फोटो नसल्याने प्रवक्ते तथा कार्यालयीन सरचिटणीस महेश माने या कार्यकर्त्यांनी काही वेळापूर्वी नाराजी व्यक्त केली होती. आम्हाला सन्मान नसेल तर आम्ही पक्षात रहावे का असा प्रश्न उपस्थित करून आपली नाराजी बोलून दाखवली. त्यानंतर त्याने मेळावा सुरू असलेल्या सुशील रसिक सभागृहात खुर्च्या फेकाफेकी केली. जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु माने यांनी काका साठे यांच्यासोबत हुज्जत घातली. रागाला आलेल्या साठे यांनी “जा बाबा तू पक्ष सोडून” म्हणून आपला राग व्यक्त केला पाह तो वरील व्हिडिओ