विरोधी पक्षनेते पद मिळणार का?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तब्बल सात मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये ही भेट झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि काही आमदारांची उपस्थिती होती.
मागच्या पाच वर्षांपासून एकमेकांना पाण्यात बघणाऱ्या दोन नेत्यांनी एकमेकांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे थेट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनामध्ये गेले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. ही सदिच्छा भेट असली तरी भेटीमुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात, असं बोललं जातंय उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तब्बल सात मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये ही भेट झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि काही आमदारांची उपस्थिती होती.