Dilip Mane यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत 53,379 विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग
सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त 49 केंद्र व 15 उपकेंद्रात एकाच वेळी घेण्यात आलेल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेत 53,379 विद्यार्थ्यांनी विक्रमी सहभाग नोंदवला. दिलीप माने तसेच युवा नेते पृथ्वीराज माने यांनी शाळांना प्रत्यक्ष भेटी देत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. स्पर्धेत सहभागी चिमुकले रंग भरण्यात दंग असल्याचे दिसून आले. चित्रकला स्पर्धेचे विविध केंद्रावर मान्यवरांनी स्पर्धेचे उद्घाटन केले.
या निमित्ताने बोलताना माने म्हणाले, ‘आजचे कलावंत हे उद्याचे भावी नामवंत कलाकार असणार आहेत. जे पुढे सोलापूरची नवी ओळख निर्माण करणार आहेत. अशा कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला आहे. याप्रसंगी मुलांना चित्र काढताना आणि रंग भरताना पाहून खूप आनंद झाला. तसेच मुलांशी मला थेट संवाद साधता आला. ही बाब मला नवी ऊर्जा देणारी आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या सर्व स्पर्धकांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप सार्या शुभेच्छा देतो.’
यावेळी दिलीप माने यांनी भारती विद्यापीठ, गोविंदश्री मंगल कार्यालय, जि.प. शाळा कल्याण नगर, सुरवसे प्रशाला, पंचशील प्राथमिक व माध्यमिक प्रशाला, सिद्रामप्पा हत्तुरे प्रशाला या केंद्रावर भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. तर डॉ. पृथ्वीराज माने यांनी धर्मण्णा सादुल प्रशाला, नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशाला, राजराजेश्वरी प्राथमिक व माध्यमिक प्रशाला, श्रीनाथ हायस्कूल, प्रणितीताई शिंदे प्रशाला, भारत उर्दू व मराठी विद्यालय या केंद्रास भेटी देऊन मुलांचा आनंद द्विगुणित केला.
चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारत जाधव, पांडुरंग चौधरी, दै. दिव्य मराठीचे संपादक नितीन फलटणकर, नौशाद शेख, व्यंकटेश पोतु, विजयकुमार हुल्ले, अशोक भांजे, शब्बीर मुजावर, सतीश दरेकर, शैलेजा राठोड, श्रीकांत उडासे, दत्तात्रय गाजरे, नागनाथ सुरवसे, आचार्य पांढरे, ॲड. सत्यजित वाघचौरे, विकास बाटलीवाला, विशाल ख्याडे, भिकाजी गाजरे, हारुण पठाण, प्रसाद कदम, हेमंत माळी, श्रीपाद सुरवसे, राजशेखर पाटील, विठ्ठल वानकर, भाग्यश्री कलशेट्टी, राजेंद्र सुपाते, सोमनाथ गायकवाड, प्रभाकर कोठे, शिवाजी कदम, राजू पवार, विनायक बिराजदार, नागेश गवळी, सतीश मस्के, श्याम धुरी, अशोक लामतुरे, कल्लाप्पा गुरव, शिवाजी बचुटे, प्रतीक ताकमोगे, रवी कांबळे, श्याम कदम, फैज अहमद इनामदार, महेश घाडगे, विष्णू वाघमारे, गोवर्धन जगताप, बाळासाहेब सुरवसे, सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
एकाच वेळी शिशु गट ते दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी 6 गटात आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. सोलापूर दक्षिण विधानसभा क्षेत्रात देगाव ते विनायक नगर या भागातील शाळेत सदर स्पर्धा आयोजित केली होती. दिलीप माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौरव समितीने विविध स्पर्धा आणि कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात चित्रकला स्पर्धा, भजन स्पर्धा, रक्तदान शिबिर, सिद्धेश्वर मंदिर येथे प्रसाद वाटप, रक्तदान शिबीर महिला भगिनींसाठी पाक कला स्पर्धा होम मिनिस्टर स्पर्धा अशा विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे.