सोलापूर प्रतिनिधी –
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोलापुरातील मार्केट यार्ड समोर गाजर आंदोलन करण्यात आला! महायुती सरकारकडून वारंवार सोलापूरकरांना विकासाच्या नावाखाली गाजर दाखवण्यात येते,तसेच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्थानिक आमदार हे उड्डाणपूल व विमानतळ च्या नावाने गाजर दाखवत आहेत अशी भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी मांडली!
2016 या वर्षात मंजूर झालेला उडानपूल अजूनही हस्तांतर आणि ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे असे असताना सुद्धा स्थानिक आमदार हे येणारी निवडणूक लक्षात घेता काम चालू होईल असे खोटे आश्वासन देत आहेत! याचा यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला!
यावेळी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अक्षय वाकसे, कार्याध्यक्ष सरफराज शेख,वैभव विभुते,अनिलकुमार व्हटकर,सिद्ध निशाणदार,तुषार पवार,परवेज शेख,नागेश बिद्री,अमोल कळंब,लक्ष्मण विटकर, फयाज सय्यद ,धीरज मुधोळकर,संदीप महाले,संजय गायकवाड, गौस कुरेशी,अनुराग मोठे, सोहेल शेख,महेश जेऊर, नूर नदाफ,अभी मडिवाळ,झाकीर शेख,खलील शेख आधी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते!