सोलापूर प्रतिनिधी,
राणे परिवारावर संपूर्ण महाराष्ट्र राज्य थुंकत आहे. एमआयएम नेते फारूक शाब्दीचे निलेश राणेंना प्रतिउत्तर
आम्ही फुकल्यावर राणे पितापुत्र उडून जाईल;फारूक शाब्दीची तिखट प्रतिक्रिया
मशिदी मध्ये घुसून मारणारा राक्षस असतो;तू राक्षस आहे का?
सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे एमआयएम प्रमुख फारूक शाब्दी यांनी राणे पितापुत्रावर सडकून टीका केली आहे.निलेश राणेंच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत विरोध करत,एमआयएम ने थुंकल्यास उडून जाईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.राणे परिवारावर सर्व राज्य थुंकत असताना,हे निलेश राणे दुसऱ्यावर थुंकण्याची भाषा करत आहेत.वेगवेगळ्या घटनांनी महाराष्ट्र राज्यात महायुतीची दमछाक होत आहे,म्हणून महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.निलेश राणे यांना फारूक शाब्दी यांनी ओपन चॅलेंज दिले आहे,निलेश राणे आगामी विधानसभा निवडणुकीत कुठे उमेदवारी भरणार आहे,सांगा त्याच्या विरुद्ध मी उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढतो असे थेट आवाहन एमआयएम नेते फारूक शाब्दी यांनी केले आहे.
नितेश राणे यांनी तीन दिवसांअगोदर मशिदीमध्ये घुसून मारू असे चिथावणीखोर भाषण केले होते.नितेश राणेंच्या वक्तव्याला सोलापुरातील एमआयएम नेते फारूक शाब्दी यांनी प्रतिउत्तर दिले आहे.मशिदीमध्ये घुसून मारू म्हणता म्हणजे कुणाच्या बापाचा राज्य आहे का?राणे कुटुंब संपूर्ण महायुतीला घेऊन बुडणार आहे असे चित्र महाराष्ट्र राज्यात निर्माण झाले आहे.मशिदी मध्ये घुसून मारू असे वक्तव्य करणारा हिंदू नसून राक्षस आहे.कोणत्याही प्रार्थना स्थळाबाबत असे वक्तव्य करणारा किंवा असे कृत्य करणारा हा राक्षसच असतो अशी संतप्त प्रतिक्रिया फारूक शाब्दी यांनी दिली आहे.