Man Marathi News Network,
छत्रपती शाहूमहाराज खऱ्या अर्थाने लोकोत्तर राजे होते यापुढेही त्यांचे विचार प्रत्येकालाच प्रेरणादायक आहेत – जिल्हाध्यक्ष संतोष पवार
सोलापूर – सामाजिक न्यायाच्या संकल्पनेचे जनक, रयतेचे राजे, लोकराजे, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला, विचारांना, स्मृतींना कृतज्ञतापूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतिने राष्ट्रवादी भवन येथे छत्रपती शाहूमहाराज यांच्या प्रतिमेस महीला शहराध्यक्ष संगीताताई जोगदनकर युवक अध्यक्ष सुहास कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन, त्यांनी दाखवलेल्या मार्गानं सर्वांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकासाच्या वाटेवरची राष्ट्रवादीची वाटचाल कायम राहील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष संतोष पवार यानी व्यक्त केला.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज खऱ्या अर्थानं लोकोत्तर राजे होते राजर्षी शाहू महाराजांचे विचार यापुढेही प्रत्येकालाच प्रेरणादायक राहील.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी आनंद मुस्तारे श्रीनिवास कोंडी बिज्जु प्रधाने, अनिल उकरंडे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले युवक अध्यक्ष सुहास कदम प्रकाश जाधव तुषार जक्का बसवराज कोळी इरफान शेख महेश कुलकर्णी ओंकार हजारे अनिल छत्रबंध अनिल बनसोडे अलमेराज आबादीराजे रुपेश भोसले रमिज कारभारी प्रकाश मोठे दत्ता वाघमोडे शामराव गांगर्डे डॉ संदीप माने आशुतोष नाटकर दत्ता बडगंची अर्जुन माळी प्रज्ञासागर गायकवाड अजिंक्य उप्पिन राजू बेळ्ळेनवरू शरद गायकवाड राजू फटफटवाले राजेश जमादार गोपाळ दोडमणी वैभव गंगणे सोमनाथ शिंदे
महिला पदाधिकारी महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर युवती अध्यक्ष किरण माशाळकर, प्रिया पवार, कांचन पवार आदी पदाधिकाऱी उपस्थितीत होते.