जितका विश्वास श्री स्वामींवर तितकाच विश्वास राजकारणात फडणवीसांवर – देवेंद्र कोठे
सोलापूर – सोलापूर महापालिकेचे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांना अखेर भाजपा कडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मेकॅनिक चौक येथील त्यांच्या संपर्क कार्यालयाजवळ पक्षाचे पदाधिकारी, कार्यक तसेच कोठे समर्थकांनी जल्लोष केला.
यावेळी माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी आपल्या संपर्क कार्यालयाच्या शेजारी असलेल्या श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले तसेच भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या शुभेच्छाचा स्वीकार केला. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत, गुलाल उधळून देवेंद्र कोठे यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. ढोलताश्याच्या गजरात यावेळी एकच जल्लोष करण्यात आला.
या जल्लोषात प्रताप चौहान, सूरज चौहान, मेघनाथ येमूल, दत्तू पोसा आदि भाजपा पदाधिकारी व कोठे समर्थकांनी जल्लोष केला.
जितका विश्वास श्री स्वामींवर तेवढाच विश्वास फडणवीसांवर – कोठे
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. माझे पालकत्व स्वीकारण्याचा शब्द त्यांनी पूर्ण करुन दाखवला. जितका विश्वास श्री स्वामी समर्थांवर तितकाच विश्वास राजकारणात देवेंद्र फडणवीसांवर आहे. पक्ष्याच्या वरिष्ठ नेत्यांसह, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार. सर्वांच्या सहकार्याने निश्चितच यश खेचून आणणार. देवेंद्र फडणवीसांनी उमेदवारी देऊन त्यांची जबाबदारी पूर्ण केली, आता मतदारांची जबाबदारी आलेल्या संधीचे सोने करण्याची आहे. माझ्या कुटुंबाची सद्य वस्तूस्थितीची फडणवीसांना कल्पना आहे. महेश कोठे हे रक्ताने काका परंतु मी भाजपा मध्ये आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मनातील शंका दूर करावी. तसेच सगळ्यांना सोबत घेऊनच काम करणार.
⁃ देवेंद्र कोठे, भाजपा उमेदवार