सोलापूर : शहर मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ प्रखर हिंदुत्ववादी नेत्या माधवी लता यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता जुना कुंभारी रस्त्यावरील ७० फूट रस्त्याजवळील माधव नगर पटांगण येथील पद्म मारुती मंदिरासमोर ही सभा होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत हैदराबाद येथून भाजपाच्या उमेदवार राहिलेल्या माधवी लता यांनी एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात लढत दिल्याने चर्चेत आल्या होत्या. या लढतीमुळे हैदराबाद येथील निवडणुकीची चर्चा संपूर्ण देशभरात झाली होती.