पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलेल्या कल्याण नगर भागाची पाहणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील D मार्ट समोरील आसरा पुलालगत असलेल्या कल्याण भागात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरून नागरिकांचे हाल होत आहेत म्हणून खासदार प्रणिती शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि सोलापूर महानगर पालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली व ताबडतोब ड्रेनेज दुरुस्ती सफाई, पावसाळी पाण्याचा निचारा करण्यासाठी तात्काळ काम सुरू करण्याची सूचना केली.
यावेळी चेतन नरोटे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सामाजिक कार्यकर्ते श्याम कदम, संजय हेमगड्डी, बाबा मिस्त्री, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, देवाभाऊ गायकवाड, तिरुपती परकीपंडला, सुभाष वाघमारे, यांच्यासह सोलापूर महानगर पालिकेचे अधिकारी वर्ग, कल्याण नगर भागातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.