सोलापूर प्रतिनिधी –
एकत्व सोशल फाउंडेशन वतीने पुतपाथवरचे कुटुंबांना तीव्र उन्हामुळे आणि शहरात पिण्यासाठी पाणी चे हाल समस्या लक्षात येता मदतीचा हात.
गतवर्ष झालेल्या कमी पावसामुळे उजनी धरणात पाणी पातळी कमी झाली आहे. यामुळे सोलापूर शहरात सात दिवसाला पाणी येत आहे.परिसरात नागरिकांना पाणीची टंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे.
हे लक्षात घेता सोलापुरातील शनी मंदिर. सिद्धेश्वर मंदिर. दत्त मंदिर. रेल्वे स्टेशन समोरील पुतपाथवरचे कुटुंब बांधवांना पिण्याचे पाण्यासाठी वन वन फिरावं लागत असल्यामुळे या भागातील लोकांना. फाउंडेशनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी थंडगार जार सोय करण्यात आले.
यावेळी किरण सरवळे. पिरप्पा कोळी. शहाबाज मकानदार. अमर बसवंती. इत्यादी परिश्रम घेतले.
सोलापुरातील या बेघर कुटुंबना तीव्र उन्हामुळे पिण्याच्या पाण्यासाठी अनेक ठिकाणी वन वन फिरावं लागत आहे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दानशूर लोकांकडून या बेघर लोकांना जेवणाचे वाटप केले जाते. असेच अनेकवेळा दिसते. शहरातील पाण्याचे हाल पाहता शहरवासीयांना एक आवाहन आहे की घरातील एक रिकाम्या बाटलीत थंडगार पिण्याचे पाणी भरून वाटेत दिसणाऱ्या बेघराना द्यावे जेणेकरून त्या लोकांना सोय होईल. असे आवाहन फौंडेशनचे प्रमुख दीपक करकी यांनी केले आहे.