Maratha Reservation :
13 जुलैपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्यांबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडणार! असा इशारा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केल्यापासून त्यांच्या भेटीसाठी राज्यातील सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील आमदार-खासदारांनी त्यांची भेट घेत त्यांना पाठींबा दिला होता. पण आजपर्यंत राज्य सरकारचा कोणताही प्रतिनिधी त्यांच्या भेटीला आलेला नव्हता. मात्र, आज सरकारचे प्रतिनिधी म्हणून कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भेट घेतली. दरम्यान सरकारला, जरांगे पाटील यांनी आरक्षणासंबंधी मागण्या पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
जरांगेंच्या प्रमुख मागण्या कोणत्या ?
1 सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी.
2 मराठा-कुणबी एकच आहेत, याबाबत कायदा करावा
3 राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत
4 हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन मराठ्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा
5 शिंदे समितीला एक वर्षांसाठी मुदतवाढ