शरद पवार हे माझं दैवत आहेत. मी त्यांचा अपमान कधीच करू शकत नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
Pimpri News | शरद पवार हे माझं दैवत आहेत. मी त्यांचा अपमान कधीच करू शकत नाही. त्यांचा अपमान केला म्हणून काहीजण नॅरेटिव्ह सेट करत आहेत. अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांनी केलेलं वक्तव्य खोडून काढत प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार हे पिंपरी- चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. पुण्यात पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक काल पार पडली. निधी वाटपावरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या आमदाराला धारेवर धरलं होतं. यावरून हे राजकारण पेटलेलं होतं. अखेर यावर अजित पवारांनी स्वतः उत्तर दिलं आहे.