शहरात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली नियोजन बैठक संपन्न
छत्रपती शिवाजी शिक्षण संकुल येथील शाहू महाराज हॉलमध्ये कार्यालयाचे उद्घाटन
सोलापूर/ प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीची नियोजन बैठक शहरातील राजर्षी शाहू महाराज सभागृह याठिकाणी संपन्न झाली. यावेळी शांतता रॅलीसाठी लाखो समाज बांधव एकवटणार असल्याचा निर्धार करण्यात आला.
याच ठिकाणी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रस्तावनेमध्ये प्रा. गणेश देशमुख यांनी मराठा आरक्षण आंदोलनात प्रभावी भूमिका बजावणारे मनोज जरांगे पाटील हे दुसऱ्या टप्प्यातील रॅलीची सुरुवात सोलापुरातून करणार आहेत असे सांगून सात ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली असल्याचे सांगितले.
यावेळी रॅली संदर्भातील महत्त्वाच्या विविध कामासंदर्भात कमिटी स्थापन करण्यात आल्या. समाज बांधवातील काही जणांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यामध्ये मराठा मोर्चा प्रमाणे शांतता रॅली ही भव्य स्वरूपात करण्याचे नियोजन करण्याचा निर्धार केला.
लाखो समाज बांधव एकत्र येणार असल्याने व्यवस्थापन, मराठा स्वयंसेवक, पार्किंग , पाणी, मोबाईल स्वच्छतागृह, महिला संदर्भातील नियोजन, रुग्णवाहिका, पोलीस प्रशासनाची दुवा साधणारी कमिटी, तालुका निहाय होणाऱ्या बैठका यांची माहिती देण्यात आली.
असे असेल नियोजन…
* 7 ऑगस्ट रोजी शांतता रॅली
* दररोज सायंकाळी 6 ते रात्री 10 कार्यालय सुरू.
* बैठका आणि नियोजन कार्यालयातून चालेल.
* प्रस्तावना प्रा. गणेश देशमुख .
* उद्यापासून मराठा समन्वयकांचा जिल्हा दौरा.
* दिनांक 28 रोजी सकाळी 11 बार्शी ,दुपारी 2 करमाळा, सायंकाळीं 6 वाजता माढा.
* दिनांक 29 – दुपारी 2वाजता माळशिरस सायंकाळीं 6 वाजता मोहोळ
* दिनांक 30 सकाळी 11 मंगळवेढा, दुपारी 2 सांगोला , सायंकाळीं 6 पंढरपूर
* दिनांक 31 सकाळी 11 वाजता अक्कलकोट सायंकाळी 6 वाजता दक्षिण आणि उत्तर तालुका
* बैठकी मध्ये सर्व प्रकारचे नियोजन यावर चर्चा झाली
* सोलापूर शहरातील बैठका या 1 तारखेपासून सुरू.
* या बैठकीला माऊली पवार, प्रा. गणेश देशमुख, आर. डी,जाधव, महादेव गवळी, शाम गांगुर्डे, प्रकाश ननावरे, संजय जाधव , प्रा.शिवाजी शिंदे,जीवन यादव ,जयप्रकाश इंगळे, आबा नवगीरे , प्रशांत देशमुख, आबा सावंत, विश्वास चवरे, सुरेश जगताप ,युवराज खुळे,शिवाजी चापले , मारुती सावंत ,प्रियांका डोंगरे, वैभवी पवार, दत्ता जाधव ,प्रकाश ननावरे, देवा घुले, दिनकर जगदाळे यांच्यासह महिला भगिनी उपस्थित होत्या.