जनशक्ती संघटनेचे अनोखे आंदोलन,साकारला प्रतिकात्मक भ्रष्टाचारी संजय माळी ; आंदोलनकर्त्या अतुल खूपसे पाटील व त्यांच्या सहकारी आंदोलक यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
सोलापूर : प्रतिनिधी
माढा तालुक्यातील खराब रस्ते आणि रस्त्याच्या कामात अधिक्षक अभियंता संजय माळी यांनी केलेल्या भ्रष्टाचारा विरोधात पुनम गेट येथे तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून रक्तदान करत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.तसेच आपल्या रक्ताने त्यांनी संजय माळी यांच्या पोस्टरवर रक्त अभिषेक करून निषेध नोंदवला तसेच आपले कार्यकर्ते बापूराव मोहिते यांना अर्धनग्न करून प्रति संजय माळी म्हणून त्यांच्या तोंडाला काळे फासले तसेच त्यांच्या गळ्यात नोटांचा हार घालून निषेध नोंदवला.
माढा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही रस्ता चांगल्या दर्जाचा नाही, प्रत्येक रस्त्याच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संजय माळी हे टक्केवारी घेऊन ठेकेदाराना काम देतात, त्यामुळे कामाचा दर्जा अत्यंत खराब आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्याआधी अत्यंत तातडीने अभियंता संजय माळी यांनी पैसे गोळा करत ठेकेदाराना कामे वाटप केली आहे, त्या कामाची सुरवात आत्ता होणार आहे, कामाचे बिल काढणे, कामे करणे, या अधिकाऱ्यांचा प्रमुख हे संजय माळीच आहेत, म्हणून परत एकदा शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधी वायपट जाणार आहे.
सर्व सामान्य जनतेच्या टैक्स मधून जमा होणारा शासन निधो भ्रष्टाचारी संजय माळी यांच्या हाताने वाटप असल्यामुळे ठेकेदाराना हव्या असल्या पद्धतीचे कामे हे चांगल्या पद्धतीचे दाखवून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून तो पैसा आपल्या गावाला घेऊन जाणार आहे. तरी संजय माळी यांना त्वरित बडतर्फ करून त्या ठिकाणी नवीन अधिकारीची नेमणूक करून संजय माळी यांची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करावी आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु ही स्टंटबाजी खूपसे पाटील यांच्या अंगलट आली तात्काळ पोलिसांनी या ठिकाणी येऊन त्यांना ताब्यात घेतले तसेच बापूराव मोहिते या कार्यकर्त्यालाही अर्ध नग्न अवस्थेत पोलिसांनी ताब्यात घेऊन सदर बजार पोलीस ठाण्याकडे रवाना केले.