Dhairyasheel Mohite Patil Meet Uddhav Thackeray
माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्री निवासस्थानी जात धैर्यशील मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने मोहिते पाटील यांना चांगली साथ दिली. त्यानिमित्त मोहिते पाटलांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले.