साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
शिबिरामध्ये शेकडो रक्तदात्यांचा सहभाग.
सोलापूर प्रतिनिधी – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 वी जयंतीनिमित्त छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान तर्फे गुरुवार १ ऑगस्ट रोजी मिलिंद बुद्ध विहार थोरला राजवाडा मिलिंद नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अडीचशे होऊन अधिक मतदान केल्याची माहिती देण्यात आली आहे.
रक्तदान शिबिराच्या प्रारंभी अण्णाभाऊ साठे गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महामानवांना वंदन करण्यात आले. यावेळी छत्रपती शाहू राजे प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक देवा उघडे, उत्सव अध्यक्ष शील भोसले, विद्याधर पोटफोडे, विश्वास शिंदे, सोहन लोंढे, पृथ्वीराज मोरे, अक्षय चव्हाण, उमेश पवार, अमर पवार, महादेव वायदंडे, नागेश पाटोळे, अमर पवार, सागर वाघमारे, आनंद तांबे, हरिदास लोंढे, श्रीमंत जाधव, कांत उघडे, सचिन वाघमारे, राज सुरते, युवराज बडेकर, सिद्धांत बाबरे, प्रसन्न निकंबे, निर्माण दंदाडे, वैजू सुरवसे, दया गायकवाड, कल्याणी संकणावरू, आकाश इंगळे, प्रवीण गायकवाड, दीपक बडेकर, राजदीप तळभंडारे, शशिकांत तळमोहिते, गणेश गायकवाड वीरसेन जाधव , बाबा कापूरे , अतिश बनसोडे , दत्ता काळे , अनिकेत दुपारगुडे, राहुल तळभंडारे, रोहित तळमोहीते, अमर दिवटे, आनंद दिवटे, यांच्यासह छत्रपती शाहू राजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराग सूत्र यांनी केले तर आभार प्रदर्शन देवा उघडे यांनी केले.