सोलापूर प्रतिनिधी –
संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर येथील संपर्क कार्यालयामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा होणे गरजेचे आहे तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना तात्काळ भारत सरकारने भारतरत्न हा किताब जाहीर करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने यावेळी करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपाध्यक्ष सिताराम बाबर संघटक रमेश चव्हाण उपाध्यक्ष रुपेशकुमार किरसावंळगी मल्लू भंडारे तेजस शेळके पिंटू कोरे सुरेश पाटील दीपक जाधव परशुराम चव्हाण ओंकार कदम रमेश साखरे आधी उपस्थित होते