Ganeshotsav २०२४ |
थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी दिनेश चव्हाण यांची निवड, अमोल शिंदे यांचाही केला सन्मान
सोलापूर : प्रतिनिधी
थोरला मंगळवेढा तालिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा व सण २०२४-२५ करिता पदाधिकारी निवड मंडळाचे आधारस्तंभ अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व कुशल संघटक संकेत पिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मंडळाचे सल्लागार, माजी अध्यक्ष, पदाधिकारी, हजारो सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी अध्यक्ष दिनेश चव्हाण, उपाध्यक्ष गौरव खुर्द, शुभम हिंगमिरे, कार्याध्यक्ष गणेश ठाकूर, खजिनदार समीर मुजावर, कुणाल दीक्षित, सचिव प्रशांत पालव, संकेत परदेशी, मिरवणूक प्रमुख विशाल चव्हाण, गणेश माळगे, पूजा प्रमुख प्रथमेश कळवंत, दत्ता लगशेट्टी, प्रसिद्धी प्रमुख अमोल मिस्कीन यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली निवडीनंतर मंडळाचे आधारस्तंभ अमोल शिंदे आणि संघटक संकेत पिसे यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याच वेळी थोरला मंगळवेढा तालीम सर्व युवकांच्या वतीने अमोल शिंदे यांची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड झाल्यानिमित्त सत्कार करण्यात आला.
या बैठकीला थोरला मंगळा तालीम मंडळाचे मार्गदर्शक प्रकाश अवस्थी, शैलेश पिसे, सागर पिसे, राज शिंदे, सचिन काळे, अमित पवार, प्रकाश औरादी, यांच्यासह मंडळाचे जेष्ठ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.