सोलापूर प्रतिनिधी –
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिनांक 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या दरम्यान भगवा सप्ताहाच आयोजन करण्यात आलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या दरम्यान भगवा सप्ताह शहर मध्य येथे आयोजन करण्यात आलं आहे हा कार्यक्रम शहर प्रमुख दत्तात्रय वानकर व उपशहर प्रमुख कृष्णा सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघांत साजरा करण्यात आला.
या भगवा सप्तांहामध्ये शिवसेना सभासद नोंदणी ,मतदार यादी ,वृक्षारोपण, असे उपक्रम राबवण्यात आले.तसेच आध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक ,वैद्यकीय, विधी ,अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व सन्मान पक्षाच्या वतीने करण्यात आला या वेळी जिल्हाप्रमुख अजय दासरी , शहर प्रमुख दत्तात्रय वानकर ,विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख लहु गायकवाड, उपशहर प्रमुख कृष्णा सुरवसे, उपशहर प्रमुख रेवन पुराणिक,उपशहर प्रमुख ओंकार चव्हाण,उपशहर प्रमुख सन्नी पवार आदींची उपस्थिती होती..
यावेळी शहर प्रमुख दत्तात्रय वानकर बोलताना म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांच्या दिलेल्या गुरुमंत्रनुसार 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या वाक्याला साजेसे प्रमाणे समाजातील लोकांचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाज घडवणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी कृष्णाजी सुरवसे यांनी पक्षाने व वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार हा भगवा सप्ताह यशस्वी करण्याकरीता तन-मन-धनाने जीवाचं रान करून पक्षाचे चिन्ह,पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याकरता जीवाचे रान करीन या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी संपूर्ण मतदारसंघातील बूथनिहाय बीएलओ प्रमुखांच्या नेमणुका तात्काळ करण्यात याव्या सभासद नोंदणी तात्काळ करण्यात यावी आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने निवडणुकीची तयारी करिता सर्वांनी तयार व्हावे याकरता मोलाचे मार्गदर्शन केले
यावेळी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ,पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ,युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे संपर्कप्रमुख अनिलजी कोकीळ व पक्षाच्या जय जयकारच्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या वेळी बिट्टू शिंदे ,राजा बुरबुरे ,आकाश अंकुश, अनिल भोसले, शुभम माने ,निखिल बिराजदार ,समीर शेख, अवि विटकर ,रोहित पवार, समीर सय्यद, अली खान, अविनाश विटकर ,शुभम पवार आकाश चव्हाण,दिनेश चव्हाण व आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच आभार प्रदर्शन उपशहर प्रमुख ओंकार चव्हाण यांनी केलं