सोलापूर प्रतिनिधी |
संतोष भाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग आयोजित सुप्रसिद्ध कलाकार अंबादास कनकट्टी यांच्या हास्यकल्लोळ कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद…
अनाथ आश्रम मध्ये मुलांना साबण व खाऊ वाटप..
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने निरीक्षणगृह बालगृह येथील मुलांच्या मनोरंजनासाठी सुप्रसिद्ध विनोदी कलाकार अंबादास कनकट्टी यांच्या हास्य दर्पण या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला प्रस्ताविकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया शहर -जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. प्रास्ताविकेनंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. व्यासपीठावर महिला आघाडी अध्यक्ष तथा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण कमिटीच्या अध्यक्षा संगीता जोगधनकर, निरीक्षणगृह बालसुधारगृह अधीक्षक उपासे मॅडम, युवती अध्यक्ष किरण माशाळकर , महिला आघाडी सचिव प्राजक्ता बागल,माजी नगरसेवक नारायण माशाळकर, डॉक्टर सेल अध्यक्ष संदीप माने, कार्याध्यक्ष महेश वसगडेकर, युवक समन्वयक महेश कुलकर्णी, डॉक्टर सेल उपाध्यक्ष डॉ. निलेश खंडागळे , जयकुमार चाबुकस्वार , संतोष भगत यांची उपस्थिती होती…
यानंतर कार्यक्रमाचे मुख्य शिल्पकार सुप्रसिद्ध कलाकार अंबादास कनकट्टी यांचाही सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते अनाथ आश्रम मधील मुलांना खाऊचे व साबण वाटप करण्यात आले.
त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. कलाकार अंबादास कनकट्टी यांनी आपल्या कार्यकुशलतेतून विविध प्राण्यांचे, पक्षांचे ,वाहनांचे आवाज काढून मुलांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमात मुलांनी मनमुराद आनंद लुटला… व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया विभाग शहर- जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे यांनी मुलांच्या मनोरंजनासाठी घेतलेल्या स्तुत्य उपक्रमाचं मान्यवरांनी विशेष कौतुक केल. असे कार्यक्रम यापुढे देखील विविध पक्षांनी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन आयोजित करावे असेही आवाहन उपस्थित मान्यवरांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे सरचिटणीस किरण अवताडे यांनी अथक परिश्रम घेतले…