man marathi news network
Solapur /
लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या सलग कार्यकाळासाठी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा पाठविल्याबद्दल जाधव यांना पंतप्रधान कार्यालयातून पत्र
_गिरीकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन पत्र_
गिरीकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एक विशेष अभिनंदन पत्र प्राप्त झाले आहे. हे पत्र जाधव यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या तिसऱ्या सलग कार्यकाळासाठी झालेल्या निवडीबद्दल शुभेच्छा पाठविल्याबद्दल पाठवलेले आहे. जाधव यांनी भारत पोस्टच्या माध्यमातून पंतप्रधान कार्यालयाला त्यांच्या विजयाच्या शुभेच्छा पाठवल्या होत्या,
सदर पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या विजयाचे श्रेय भारतीय लोकतंत्राच्या महान परंपरेला आणि ‘सबका साथ, सबका विकास’ या दृष्टिकोनाला दिले आहे. त्यांनी सांगितले की, सहा दशकांनंतर प्रथमच तिसऱ्या सलग कार्यकाळासाठी सरकार निवडून आले आहे. हे सरकार 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या ध्येयाने पुढे जात आहे आणि या मिशनला जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास मिळत आहे.
हे पत्र जाधव यांच्यासाठी विशेष आहे कारण पाच वर्षांपूर्वी, मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात, जाधव यांनी दिलेल्या शुभेच्छांच्या प्रतिसादात त्यांना अशाच स्वरूपाचे पत्र प्राप्त झाले होते. पंतप्रधान मोदींनी जन भागीदारीच्या माध्यमातून भारताला नवीन उंचीवर नेण्याच्या दृढ संकल्पाचा पुनरुच्चार केला आहे आणि जाधव व त्यांच्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्य, शांती आणि समृद्धीची शुभेच्छा दिल्या आहेत.