सोलापूर प्रतिनिधी –
भाजप संविधान आणि लोकशाही विरोधी आहे. संविधान, लोकशाही आणि सर्वधर्मसभाचे विचार वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार :- खासदार प्रणिती शिंदे
महात्मा गांधीजींनी ज्या प्रमाणे ब्रिटिशांना चले जाव म्हंटले होते त्याचप्रमाणे हुकूमशाही, महाराष्ट्रद्रोही भाजप प्रणित तिघाडी सरकारला सत्तेवरून घालवून द्यायची वेळ आली आहे :- चेतन नरोटे
सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
१५ आँगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त गुरूवार दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ठीक ८:३० वाजता सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन नरोटे शहर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे ध्वजारोहण (झेंडा वंदन) कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी आकाशात तिरंगे फुगे सोडण्यात आले.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सर्व सोलापुरवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर शहर काँग्रेस सेवादल चे अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे यांनी केले.