सोलापूर दि. 12 महानगरपालिकेच्या आवारात आज दुपारी पालिका आयुक्तांच्या शासकीय वाहनावर ड्रेनेज पाणी ओतून भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाचा निषेध केला आहे.
न्यू बुधवार पेठेतील मातोश्री रमाबाई नगरातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भीम आर्मी संघटनेचे कार्यकर्ते या भागातील महिला पालिका आयुक्तांकडे निवेदन घेऊन आज दुपारी आल्या होत्या. यावेळी आयुक्तांच्या कार्यालयात अन्य विषयाची बैठक सुरू होती. भेटण्यासाठी कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना थांबण्यास सांगण्यात आलं. पालिका अधिकाऱ्यांना रमाबाई आंबेडकर नगर मध्ये गेली अनेक दिवसापासून असलेल्या घाण पाण्याचे समस्या, ड्रेनेज तुंबणे दुर्गंधी याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. घटनास्थळी स्वतः भेट देण्यासाठी येत नाहीत. आम्ही आलो तर आम्हाला भेटत नाहीत. असे म्हणत कार्यकर्त्यांनी सोबत आणलेलं घाण पाणी पालिका आयुक्तांच्या गाडीवर फेकलं. इंद्रभवनच्या मुख्य इमारतीत हा प्रकार 12:30 च्या सुमारास घडला. वाहन चालक आणि सुरक्षा पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी यावेळी पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी ही केली.
भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष अजय मंदिर अजय मैंदर्गीकर यांनी रमाबाई आंबेडकर नगरातील समस्यांबाबत प्रसार माध्यमांना नंतर माहिती दिली.