लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब अभिष्टचिंतन सोहळा नियोजन समितीची पत्रकार परिषद..
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री,लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात विविध सामाजिक,क्रीडा,आरोग्य,शैक्षणिक,पर्यावरणीय आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून हा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये 1,11,167 वृक्ष लागवड व 1,11,167 वह्यांचे वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याचाच एक भाग म्हणून,पहिल्या टप्प्यात दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी पक्षाच्या वतीने
“दक्षिण सोलापूर वनपरिक्षेत्र नांदणी येथे_5567 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.”
वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या हार, गुच्छ अश्या सत्काराचे स्वरूप टाळून,आम्ही सर्व कार्यकर्ते व
लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला आवाहन करतो की त्यांनी शैक्षणिक साहित्य स्वरुपी सत्कार करावे. हे साहित्य नंतर सोलापूर शहर व जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
पक्षाच्या वतीने पर्यावरण संवर्धन आणि शैक्षणिक उन्नतीकडे एक पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्या मध्ये आणि सोलापूर शहरा मध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाणार आहे.
त्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर,रक्तदान शिबिर,महाआरोग्य शिबिर,प्रशिक्षण शिबिर,समाजाने नाकारलेल्या लोकांना ब्लँकेट वाटप,प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटप,अन्नदान वाटप,होम मिनिस्टर,अनेक शाळांमध्ये स्पर्धांचे आयोजन आदी सारखे विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
या पत्रकार परिषदेस अभिष्टचिंतन सोहळा नियोजन समितीचे प्रमुख शामसुंदर गायकवाड,अतुल नागटिळक,पवन थोरात,सुशील सरवदे,शाम धुरी,शिवम सोनकांबळे,तात्या काळे,बाबासाहेब माने,दत्ता वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.