दक्षिण सोलापूर तालक्यातील जनतेने साथ देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे, व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले
निवडणूक जिंकण्यासाठी फडणवीसांच्या इशाऱ्यावरून दंगल घडविण्याचा प्रयत्न होता.
सोलापूर प्रतिनिधी –
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे ह्या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेचे, शेतकऱ्यांचे, महाविकास आघाडीचे नेते मंडळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सोलापूर शहरातील जामगोंडी मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
दक्षिण सोलापूर तालक्यातील जनतेने आणि सहकार्य केलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, महविकास आघाडीचे इतर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे, व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सौ उज्वलाताई शिंदे यांनी आभार व्यक्त केले.
सर्वांचे आभार व्यक्त करताना नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेचे प्रत्येक गावात मताचे लीड देऊन माझा विजय सुकर केला, या आधीही शिंदे साहेबांना साथ दिली हे उपकार फेडू शकणार नाही, त्याच बरोबर स्वर्गीय आनंदराव देवकते यांचेही उपकार आहेत. ते उपकार फेडण्यासाठी दक्षिण सोलापूरचा विकास, शेतकऱ्यांना हमीभाव, दुधाला दर, वीज पुरवठा, कांदा निर्यात, GST चा त्रास, बेरोजगारांच्या हाताला काम, आरक्षणाचा प्रश्न, निराधारांना पेन्शन, रस्ते आधी विकासकामे करायचे आहेत तरच त्यातून उतराई होईल. तुमचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी आतुर आहे. काम केल्यामुळे शहर मध्य मधील जनतेने तीन वेळा आमदार केले. लोकांचे काम करण्यात समाधान आहे ते कोणत्याही मंत्रपदात नाही. या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे घटक पक्ष, सिध्देश्वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी साहेब यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी सहकार्य केले त्यांचेही आभार, या निवडणुकीत आपल्याकडून राहुल गांधी प्रचारासाठी आले होते. निवडणूक जिंकण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावरून जातीधर्मात तेढ निर्माण करून दंगली घडवायचा प्रयत्न केला. भाजप उमेदवार सुद्धा भांडणे लावायच्या प्रयत्नात होते. पैसे वाटले. मोदी, योगी, टी. राजासिंह, अनेक मंत्री यासारखे अनेक नेते प्रचाराला आले. पण जनतेने जातीधर्माचे राजकारण करणाऱ्या, संविधानाला विरोध भाजपला चपराक दिला. हा विजय भाजपच्या राक्षसी मानसिकतेच्या विरोधातील विजय आहे. लोकांनी काम करणाऱ्यांना विजयी केले. आगामी विधानसभा निवडणुकीत दक्षिण मधून आमदार महाविकास आघाडीचा झाला पाहिजे यासाठी तयारीला लागा. शिंदे साहेबांनी अनेकांना मोठ्ठे केले. आजपर्यंत जिल्ह्याचे नेतृत्व केले यापुढे तसेच राहील. कार्यकर्त्यांनी आपली बहीण खासदार झाली आहे म्हणून गर्वाने सांगा लोकांचे कामे आणा मला भेटायला कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही डायरेक्ट येऊन भेटा असे म्हणाले.
या कृतज्ञता मेळाव्यास माजी आमदार दिलीपराव माने, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, सुरेश हसापुरे, शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील, संजय पौळ, भीमाशंकर म्हेत्रे, तालुका अध्यक्ष हरिष पाटील, राष्ट्रवादीचे महिला अध्यक्ष सुनीता रोटे, बाळासाहेब शेळके, शालिवाहन माने, भीमाशंकर जमादार, भारत जाधव, नागेश ताकमोगे, अलकाताई राठोड, प्रियाताई बसंवंती अशोक देवकते, महादेव कोगणुरे, संजय हेमगड्डी, शिवा बाटलीवाला, मनोज यलगुलवार, मोतीराम राठोड, अनुराधा काटकर, सुभाष चव्हाण, रमेश हसापुरे, विजयकुमार हत्तूरे, गंगाधर बिराजदार, गणेश डोंगरे, भारत जाधव, विजय राठोड, श्रीदीप हसापुरे, संजय गायकवाड, अनंत म्हेत्रे, सैफन शेख, सिकंदरताज पाटील, वाघेष म्हेत्रे, अरुणा बेंजरपे, वरून सुर्वे, सुदर्शन, अशोक बिराजदार, हसापुरे, वसंत पाटील, रावसाहेब व्हनमाणे, प्रमिला तुपलवंडे, राधाकृष्ण पाटील, धर्मराज पुजारी, सुभाष पाटोळे, जयशंकर पाटील, संतोष पवार, बनसिद्ध बन्ने, नितीन भोपळे, बाळासो माने, रमेश आसबे, महेश घाडगे, शावरप्पा वाघमारे, विठ्ठल म्हेत्रे, चंद्रकांत खुपसंगे, अझर शेख, जिशान मुल्ला, पद्मसिंह शिवशेट्टी, युंनुस शेख, रवी वायचाळ , काशिनाथ कुंभार, तेजस गंभीरे, संजय बनसोडे, विक्रम झाडबुके ,पद्मराज पाटील, अमोगसिद्ध ख्याडे, विश्वनाथ चौगुले, राहुल राठोड, शशिराज महागावकर, राहुल जरग, आप्पासाहेब काळे, भीमाशंकर टेकाळे, शाकीर सगरी, किरण राठोड, राज पाटील, अमीर शेख, आप्पू शेख, महमद शेख, धीरज खंदारे, यांच्यासह इतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.