सोलापूर प्रतिनिधी –
आज सिध्देश्वर प्रशालेमध्ये शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी सिध्देश्वर प्रशाला व राष्ट्रीय हरितसेना यांच्या संयुक्त विद्यमाने ' *एक पेड़ माँ के नाम' #Plant4Mother हा उपक्रम राबविण्यात आला. प्रथम सामाजिक वनिकरणाचे वनपाल सचिन जोशी,रोहन इंगवले तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक राजकुमार उंबरजे, पर्यवेक्षक विनोद बिराजदार यांच्या शुभहस्ते वडाच्या रोपाची पूजा करण्यात आली. नविन शैक्षणिक वर्षामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करुन त्यांना शालेय पुस्तके व पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सोलापूरला हरित सोलापूर करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून दोन रोपे घेऊन सोलापूर परिसरात १००१ वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला.या उपक्रमात प्रशालेतील सर्व शिक्षकांनी प्रत्येकी दोन रोपे देऊन उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला. नविन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच श्री सिध्देश्वर देवस्थान गुणवत्तावाढ समितीचे चेअरमन मा. डॉ. राजशेखर येळीकर सर यांच्या शुभहस्ते प्रशालेतील सर्व शिक्षक बंधुभगिनींचे वार्षिक नियोजनपत्र व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.तसेच सामाजिक वनिकरणाचे वनपाल सचिन जोशी व रोहन इंगवले यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील सर यांच्या शुभहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.