सोलापूर प्रतिनिधी –
सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी कृतज्ञता मेळाव्यात बोलताना ‘मतदानाच्या दोन दिवस आधी भाजपचा सोलापुरात दंगली घडविण्याचा प्रयत्न होता’ असा खळबळजनक आरोप केला होता. खासदार शिंदेंच्या त्या आरोपाला भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सडेतोड उत्तर देताना ‘दंगलींचा विषय काढायचा झाला तर गोष्ट खूप लांबपर्यंत जाईल. बोलताना शब्द जपून वापरा; अन्यथा आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला खूप महागात पडेल’ असा इशाराही दिला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळ्यांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता… असे वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केले होते.
त्यावर पलटवार करत अक्कलकोट चे आमदार तथा सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की, “प्रणितीताई”
सोलापुरात ज्या ज्या वेळी दंगल झाली त्या त्या वेळी कोणाची सत्ता होती ? सोलापूरच्या दंगलीमध्ये कोणाची पिलावळ सहभागी होती ?
असे म्हणत सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर पलटवार केला आहे.