सोलापूर प्रतिनिधी –
बकरी ईद निमित्त बोकडाचे भाव वाढले
मुस्लिम धर्मियांचा सण सोमवारी (ता. १७) बकरी ईद असल्यामुळे सोलापुरात जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात बोकड विक्री होताना पाहायला मिळत आहे.
मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण असल्याने इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम बांधव हे ‘ बकरी ईद ‘ सणाच्या निमित्ताने बकऱ्याची कुर्बानी देतात.
यंदाच्या बकरी ईद निम्मित बोकडाचे भाव मोठया प्रमाणात वाढले आहे. बकरी ईदला काहीच दिवस बाकी आहेत. सोलापुरात मोठ्या प्रमाणात बकऱ्याचा आठवडा बाजार भरत असतात. बकरी ईद निमीत्त जिल्हाभरात बोकडांची मोठी मागणी होत आहे. सोलापुरातील मंगळवार बाजार, किडवाई चौक, कन्ना चौक याठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजार भरतो, शहारातील आठवडी बाजारात विविध जातीच्या बोकडांची विक्री होताना पाहायला मिळत आहे.
कोणत्या राज्यातून येतात ?
ईद निमीत्त शहरातील बाजारात बोकड घरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शेतकरी व व्यापारी बोकड विक्रीसाठी बाहेरून म्हणजेच मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यातून आपली बकरी विक्री करण्यासाठी सोलापुरात येतात..
सोलापुरात या ठिकाणी भरतो बाजार ?
शहरात मंगळवार बाजार, किडवाई चौक, कन्ना चौक तसेच जिल्ह्यात मोडनिंब, सांगोला, पंढरपूर, अकलूज, मंद्रूप, कामती, वैराग ही जनावरांच्या विक्रीचा मुख्य बाजार भरतो. त्यातही शेळ्या आणि बोकडांचे स्वतंत्र बाजार याठिकाणी भरवला जातो.
बोकडाच्या किती जाती ?
बोकडांमध्ये विविध जातींचा समावेश होतो, गावरान उस्मानाबादी, बोर, बिटल, हैदराबादी, कोटा अशा जाती पडतात, त्यात बकरी ईदला सोलापुरात गावरान, बिटल बोकड्याची सर्वाधिक विक्री होते. आदी अन्य जातीचीही ५ ते ६ बोकडं बाजारात आहेत.
बाजारात आवक कशी आहे ?
बकरी ईद हा मोठा सण असतो. तसेच या सणात बोकडांना फारशी मागणी असते. बकरी ईद निमित्त शेतकरी, व्यापारी आपली बोकड विक्रीला आणतात. मोठया प्रमाणात बकरी ईद निमित्त येतात. विविध राज्यातून सोलापुरात कुर्बानीसाठी खास बकऱ्यांची आवक अधिक प्रमाणात होते.
सध्या बोकडाचा भाव ?
प्रामुख्याने बोकडाच्या वजनानुसार त्याच्या किंमती ठरत असतात. यंदाच्या वर्षी थोडा भाव वाढला आहे. बकरी ईद मुळे बोकड साधारणपणे १२ हजारांपासून बोकड विक्रीसाठी उपलब्ध असून तब्बल ४० हजारापर्यंत एवढी बोकडांची किंमत सोलापूरच्या बाजारात आहे.
बाजारात एवढी होती उलाढाल?
बकरी ईदच्या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी देण्याची मुस्लिम समाजाची परंपरा आहे. या बकऱ्यांच्या विक्रीतून आर्थिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात होते. यामध्ये एका बाजारात साधारता ५० ते ६० लाखाची उलाढाल होते.
चंद्रकोर असणारा साधारण किती किंमत असते ?
बोकडाच्या कपाळावर किंवा अंगावर चंद्रकोर असेल तर, ‘चंद्रकोर’, या गोष्टींचं मुस्लिम धर्मियांमध्ये मोठं महत्व आहे. या बोकडांची किंमती १ लाखाच्या पुढे विकली जातात. ज्या बोकडांच्या अंगावर चंद्र, चांदण्यांच्या खुणा असतील, कुर्बानीसाठी अशा बोकडांना अधिक मागणी असते. त्यामुळे या बोकडांना मोठी किंमत मिळते.
सामान्य दिवसांच्या तुलनेत बकरी ईदच्या वेळेस बोकड्यांच्या मागणीत प्रचंड वाढ होते. मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक अनेक राज्यातून विक्रीसाठी येतात. यामध्ये उस्मानाबादी गावरान या बकऱ्यांचे अधिक मागणी असते. बाजारात प्रजाती उपलब्ध आहेत.
अजय गायकवाड
शेळी बोकड व्यापारी,