राष्ट्रवादी शरद पवार गटाने फोडली महायुतीच्या काळ्या कारनाम्याची दहिहंडी
सोलापूर,(प्रतिनिधी)ः- राज्यात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारने बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महागाई वाढवली असून त्यांचे काहे कारनामे पत्रकाच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असल्याची माहिती शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिली.
गेल्या दोन वर्षापासून राज्याच्या सत्तेत आलेल्या महायुतीच्या सरकारने जनतेची दिशाभूल करून महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी वाढवली आहे त्यांचा निषेध म्हणूनच सात रस्ता चौकात राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाच्या वतीने महायुतीचे काळे कारनामे असलेले पत्रक काढून प्रकाशन करण्यात आले तसेच नागरीकांना काळे फुगे वाटण्यात आले. यावेळी महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर हे महायुतीचे काळे कारनामे असलेले पत्रक जनते पर्यत पोहोचवणार असून जनतेने भ्रष्ट आणि महागाई वाढवणार्या महायुती सोबत राहू नये असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली माजी महापौर मनोहर सपाटे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, प्रदेश प्रवक्ता अॅड. यु एन बेरिया, जनार्दन कारमपुरी, प्रशांत बाबर, सर्फराज शेख, चंद्रकांत पवार, सुनिल इंगळे, अजित बनसोडे, सुर्यकांत शेरखाने, सनी म्हेत्रे, शक्ती कटकधोंड, मुसा अत्तार, अक्षय जाधव, रामप्रसाद शागालोलू, प्रमोद भवाळ, महिला अध्यक्षा सुनिता रोटे, रेखा सपाटे, वंदना भिसे, सिया मुलाणी, कविता कोडवाल, गौरा कोरे यांच्यासह मोठ्यासंख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.