Bigg Boss Marathi Season 5 | Trupti Desai
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा पाचवा आठवडा आता सुरू आहे. चार सदस्य या खेळातून बाहेर पडले आहेत. पण पहिल्या दोन आठवड्यांतला खेळ पाहता हा शो स्क्रिप्टेड तर नाही ना? असा प्रश्न नेटकरी आणि प्रेक्षक विचारून लागले आहेत. याला अनेक कारणंही आहेत. त्यामुळं सोशल मीडियावर याबद्दल चर्चा सुरू आहे. तर बिग बॉसच्या माजी स्पर्धक तृप्ती देसाई यांनी देखील एक पोस्ट शेअर करत एक मनातली शंका व्यक्त केली आहे. तर सध्या बिग बॉसच्या घरातल्या एका व्हिडिओमुळं देखील प्रेक्षकांच्या मनातही अनेक प्रश्न आले आहेत.