एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि स्मारके, दुसरीकडे महिला सुरक्षित नाहीत, भ्रष्टाचारी महायुती सरकारची उलटी गिनती सुरू झाली आहे :- प्रणिती शिंदे
महायुती खोके सरकारच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे, मालवण येथील राजकोट किल्ल्यामधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला यांच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस आणि महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्हाधिकारी जुना कार्यालय पुनम गेट समोर निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी केंद्रातील मोदी आणि राज्यातील महायुती सरकारच्या निषेधाच्या जोरजोरात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
यावेळी बोलताना प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे याचा आम्ही निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. मुख्यमंत्र्यांचा मुलाला खूष करण्यासाठी त्यांचा मित्राला हे काम देण्यात आले. भूमिपूजन करून अनेक वर्षे झाले असतानाही अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी स्मारक उभा न करता लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाईगडबडीने पंतप्रधानांना खूष करण्यासाठी अतिशय कमकुवत, निकृष्ट उभारणीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पडल्यानंतर ही निर्लज्जपणे म्हणतात की वाऱ्याच्या वेगाने पडले, दीपक केसरकर बेताल वक्तव्य करत आहेत अश्या विकृत मानसिकतेचे सरकार असले तर दाद कोणाकडे मागायची. एकीकडे पुतळा विटंबना दुसरीकडे महाराष्ट्रात महिलांवर वाढलेले अत्याचार, महिला सुरक्षित नाहीत, स्मारके सुरक्षित नाहीत, म्हणून जनतेचा या लोकांवरचा विश्वास उडाला आहे. कितीही योजना आणून जनतेला अमिष दाखविले तरीही लोकसभेत ज्याप्रमाणे चित्र दिसले विधानसभेत ही तोच चित्र दिसणार आहे. महायुती सरकारची उलटी गिनती सुरू झाली आहे म्हणून निवडणुका पुढे ढकलत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळला, महाराष्ट्रात महिलांवर वाढलेले अत्याचार, पाणीपट्टीत दहापटीने वाढ, महानगरपालिका व विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलणाऱ्या महायुती सरकारचा निषेध करते.
या निषेध आंदोलनात काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुधीर खरटमल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर अध्यक्ष महेश धाराशिवकर, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, संजय हेमगड्डी, आरिफ शेख, नाना काळे, अशोक निंबर्गी, विनोद भोसले, मनोज यलगुलवार, फिरदौस पटेल, अनुराधा काटकर, सुदीप चाकोते, प्रमिलाताई तुपलवंडे, गणेश डोंगरे, अंबादास बाबा करगुळे, दत्तु बंदपट्टे, जुबेर कुरेशी, देवाभाऊ गायकवाड, हणमंतू सायबोळू, केशव इंगळे, सुशील बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, नजीब शेख, वाहिद बिजापूरे, अक्षय वाकसे, प्रताप चव्हाण, विष्णू कारमपुरी, विजय पुकाळे, दत्ता गणेशकर, अनिल मस्के, हेमाताई चिंचोलकर, अशोक कलशेट्टी, शौकत पठाण, श्रीकांत वाडेकर, रामसिंग आंबेवाले, NK क्षीरसागर, प्रवीण वाले, भोजराज पवार, दीनानाथ शेळके, सागर उबाळे, पृथ्वीराज नरोटे, वैभव पाटील, सूर्यकांत शेरखाने, सुनील इंगळे, सर्फराज शेख, शिवशंकर अंजनाळकर, लखन गायकवाड, विवेक कन्ना, रुपेश गायकवाड, अशोक देवकते, हारून शेख, सुनील सारंगी, मल्लेष सूर्यवंशी, विजयालक्ष्मी झाकणे, आकाश जांभळे, करिमुनिसा बागवान, शोभा बोबे, संघमित्रा चौधरी, अंजली मंगोडेकर, आशा गायकवाड, मुमताज तांबोळी, अनिता भालेराव, चंद्रकला निजमलू, अरुणा बेंजरपे, संध्याताई काळे, शुभांगी लिंगराज, मुमताज शेख, शिल्पा चांदणे, जितू वाडेकर, जितराज गरड, मिरा घटकांबळे, श्रीकांत दासरी, परशुराम सतारेवाले, नुरअहमद नालवार, शिवाजी साळुंखे, रमेश जाधव, संजय गायकवाड, नागेश बोमड्याल, मेघश्याम गौडा, लक्ष्मीकांत साका, विवेक इंगळे, गिरिधर थोरात, चंद्रकांत टीक्के, गिरिधर शिंदे, नागेश म्हेत्रे, राधाकृष्ण पाटील, सुभाष वाघमारे, मोहसीन फुलारी, राजेश झंपले, महेंद्र शिंदे, मुश्ताक लालकोट, श्याम केंगार, मल्लिनाथ सोलापूरे, गोपाळ मामड्याल, रूकैय्या बिराजदार, अभिलाष अच्युगतला, रविकांत कल्याणकर यांच्यासह काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.