सोलापूर प्रतिनिधी –
सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक आ.यशवंत माने कालपासून सोलापूर दौर्यावर होते.त्यांना आॅल इंडिया मुस्लिम विकास परिषद व डाॅ.मौलाना अझाद अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था विलफेयर असोशिएशनच्या वतीने अध्यक्ष हाजी.एम.डी.शेख यांच्या नेतृत्वात शिष्ठमंडळाने मुस्लिम समाजाच्या समस्यांचे निवेदन देऊन चर्चा केली असता त्यावर आमदार माने म्हणाले मंगळवारी सकाळी अजित दादा बरोबर बैठक आहे त्या बैठकीत सर्व मागण्या मांडून निवेदन देऊन तुमच्याबरोबर चर्चेसाठी दादांची वेळ घेतो त्यावेळेस तुम्ही चर्चेसाठी या.मुस्लिम समाजाच्या ,शैक्षणिक सामाजिक व अर्थिकदृष्ट्या मजबूतीसाठी या चालूवर्षापासून मुस्लिमांना ५% शिक्षणात आरक्षण मिळावे.
मौलाना अझाद अर्थिक विकास महामंडळाला १हजार कोटीचे अनूदान द्यावे.वफ्फ बोर्डाचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात व्हावे.वफ्फचे कामकाज जोमाने चालण्यासाठी वफ्फ बोर्डाला १०० कोटी अनूदान द्यावे.येत्या नवीन वर्षातील अभ्यासक्रमात लादण्यात आलेले मनूस्मुर्तिचे भाग वगळण्यात यावे तसेच सद्या राज्यातील शिक्षण विभागाने शिक्षकांची पदभरती करताना पवित्र पोर्टलच्या नावाखाली घेण्यात आलेल्या पदभरतीत ऊर्दु शाळांमध्ये शिकविण्यासाठी इतर समाजाच्या उमेदवारांना म्हणजेच ऊर्दुचे ज्ञान नसणार्या उमेदवारांना भरती करण्यात आले ते त्यांना ऊर्दुकडे न वळविता इतर शाळांमधेच त्यांना पाठवावे व मुबंई उच्च न्यायलयाच्या औरगांबाद खंडपीटाने सन २०१६ साली एका जनहित याचेकित अल्पसंख्यांक शाळांमध्ये उमेदवारांना पदभरतीसाठी टीईटी(TET)अनिवार्य नसल्याचे निर्देश खंडपीटाने दिले त्यांचा जीआर महाराष्ट्र शासनाने काढून अमलबजावणी करावे.अल्पसंख्यांक शाळामधील रिक्त असलेले पदे १००% पदभरती करण्यास महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय निर्गमित करावे या सर्व मागण्यांचे निवेदन १२ जून २०२४ रोजी सकाळी ७ वाजता मूंबई येथील देवगीरी बंगल्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना देण्यात आलेल्या आहेत त्यात आणखीन भर म्हणून महायुतीचे सोलापूर जिल्हा समन्वयक आ.यशवंत माने यांना चर्चा करुन शिष्टमंडळाने वेगवेगळे तीन निवेदन सादर केले.त्यात अध्यक्ष हाजी एम.डी शेख,दौला ,अकलाख शेख,मुद्दसर शेख,गौस शेख,एम.के भागोजी,बशीर शेख,नजीर शेख आदि यावेळी उपस्तित होते.