विद्यार्थ्यांच्या जिवीतास धोका: आनंदनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरवस्था
आनंदनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरवस्था|
सोलापूर : प्रसाद दिवाणजी
सोलापूर तालुक्यातील देगांव येथील आनंदनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अत्यंत दुरावस्था झाली असून शाळेच्या वर्गखोल्यांच्या बाहेर असणाऱ्या छताच्या पत्र्याला भोके पडल्याने पाऊसाचे पाणी वर्गात पडत आहे त्यामुळे ज्ञानार्जन करताना विद्यार्थ्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. देगांव येथील आनंदनगर जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची मागील अनेक वर्षापासुन दुरावस्था झाली असून पावसाळ्यात छताला असणारया पऱ्याला भोके पडल्याने वर्गाला गळती लागली आहे.त्यामुळे वर्ग खोल्यात व व्हराड्यांत पाणी साचत आहे.कार्यालयाच्या छताला गळती लागल्याने तेथील शैक्षणिक साहित्य भिजले जाऊ शकते. तसेच शिक्षण घेण्यास व शिक्षण देण्यास मुलांसह शिक्षकांना अडचणीस सामोरे जावे लागत आहे .देगांव येथील आनंदनगर जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यत वर्ग आहते तर पाच शिक्षक कर्मचारी कार्यरत आहेत.शाळेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच शाळा समिती अध्यक्षांनी शाळेची पाहणी करुन त्वरीत शाळा दुरुस्ती करावी अशी मागणी केली. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठविण्याची मानसिकता आर्थिकदृष्ट्या सक्षम पालकात नसते.
त्यामुळे सर्वसामान्य व गरिब कुटुंबातील पालकांना आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठविण्याशिवाय पर्याय नसतो.जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चांगल्या प्रकारे ज्ञानार्जनाचे कार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठावा म्हणून घरी तसेच वाड्या वस्तीवर जातात व शिक्षणाचे महत्त्व पालकांना पटवून सांगतात. त्यामुळे या शाळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सुसज्ज अशी इमारत तसेच वेळोवेळी शाळाची दुरुस्ती करणे ही गरज आहे.