सोलापूर प्रतिनिधी –
सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी रविवार, १ सप्टेंबर रोजी अचानक आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत शरदचंद्र राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. अवघ्या सहा महिन्यातच खरटमल यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या शहराध्यक्ष पदाला रामराम ठोकल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे शरदचंद्र राष्ट्रवादीचे सोलापुरातील नेते माजी महापौर महेश कोठे हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा गेल्या दिवसात रंगल्या होत्या. पण अचानकच खरटमल यांनी पदाचा राजीनामा दिला पण पक्ष मात्र सोडला नसल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.