सोलापूर प्रतिनिधी –
मोहोळ येथील जुन्या भाजी मंडई येथे असलेल्या बिराजदार हॉस्पिटलच्या डॉक्टर रश्मी संतोष बिराजदार यांनी रविवारी राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबतची फिर्याद त्यांचे पती संतोष बिराजदार यांनी दिली आहे. संतोष बिराजदार हे स्टेशनरी दुकान चालवतात. त्यांचे जुन्या भाजी मंडईजवळ हॉस्पिटल आहे. रोजच्याप्रमाणे साडेदहा वाजत कामाासाठी संतोष दुकानात गेले. त्यावेळेस त्यांना घरून फोन आला की त्यांच्या पत्नी डॉ. रश्मीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना १० ते एकच्या दरम्यान घडली. त्यानंतर संतोष व रुग्णालयातील सहकारी सलीम उर्फ सद्दाम कादर मकानदार यांनी दार तोडून बघितले तेव्हा डॉ. रश्मी या गळफास घेतलेल्या अवस्थेत होत्या. त्यानंतर ही घटना पोलिसांना कळवली आणि त्यांना ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी व पती असा परिवार आहे.