लोकमंगल फाउंडेशनच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
सोलापूर प्रतिनिधी,
माणसाच्या आयुष्यात गुरुला मोठे महत्व आहे. गुरुंकडे होणार्या ज्ञानार्जनामुळे आज देशासह जगाने आधुनिक तंत्रज्ञानात भरारी घेतली आहे. देशाला प्रगतीच्या उंचीवर नेण्यासाठी हुशार व चांगली पिढी घडविण्याचे काम शिक्षकांकडून अविरतपणे सुरु असते. देशाची भावी पिढी घडवण्याची सर्वात मोठी जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर आहे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी शिक्षक अहोरात्र कष्ट घेतात, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
लोकमंगल फाउंडेशन व लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था आयोजित शिक्षकरत्न पुरस्कार व आदर्श शाळा पुरस्कार 2024 वितरण समारंभ रविवारी हिराचंद नेमचंद वाचनालय किर्लोस्कर सभागृह येथे पार पडला, याप्रसंगी आ. देशमुख बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, गुरण्णा तेली, डॉ. आशालाता जगताप, डॉ. हनुमंत जगताप, अलका देवडकर, अरविंद जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी वैशाली कैलास बोते, मंजुषा बाबुराव फुलारी, शिवकन्या कंदरेकर, शीला सुजित हावळे, लक्ष्मण भागवत माळी, संगीता संतोष रेळेकर, विजय बब्रुवाहन माने, अल्पना पंडित परदेशी, डॉ. गौतम सुभान कांबळे, अब्बास हुसेन शेख, अशोक टिळक यांना शिक्षकरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. खातगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कंदलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला.