Govinda Audio Cilp Viral –
बॉलिवूड अभिनेता व शिवसेना शिंदे गटाचे नेते Govinda यांच्या हातून मिस फायर झाल्याने त्यांच्याच रिव्हॉल्वहर मधून त्यांच्याच पायाला गोळी लागल्याची घटना समोर आली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
आज मंगळवारी पहाटे ४.४५ वाजता अभिनेत्याला त्यांच्याच रिव्हॉल्व्हरमधून गोळी लागली. गोविंदा कोलकत्त्याला निघाले होते. कोलकत्त्याला जाण्याआधी गोविंदा आपलं रिव्हॉल्व्हर त्यांच्या बॅगमध्ये ठेवत होते. त्यावेळी अचानक त्यांच्या हातातून रिव्हॉल्व्हर सुटलं खाली पडलं आणि त्यातून निघालेली गोळी थेट त्यांच्या पायाला लागली. त्यांना क्रिटीकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून डॉक्टरांनी त्यांच्या पायात घुसलेली गोळी काढली आहे. आता त्यांची तब्येत बरी असून ते रुग्णालयात डॉक्टरांच्या
रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून डॉक्टरांनी त्यांच्या पायात घुसलेली गोळी काढली आहे. आता त्यांची तब्येत बरी असून ते देखरेखीखाली आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी गोविंदा यांचं रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतलं असून पुढील तपास करत आहेत.