मराठा समाजाच्या आडवं येणाऱ्या लक्ष्मण हाकेला मराठा समाज आडवा करेल – राजन जाधव
सोलापूर – सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापुरातील मरीआई चौकात लक्ष्मण हाके यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा बांधव आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले.
काल सोशल मीडियावर लक्ष्मण हाके यांचा मद्यपान केलेला कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आज सोलापुरात मराठा समाजाच्या वतीने हाके विरोधात जोडे मार आंदोलन करण्यात आले. हाके यांच्या फोटोला चप्पलीचा घातलेल्या हार आणि शेजारी दारूची बाटली असलेल्या पोस्टरला मराठा समाजाकडून जोडे मार आंदोलन करत मराठा बांधवांनी लक्ष्मण हाके यांच्या पोस्टरला पायदळी तुडवण्यात आले. यावेळी हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सरकार मधील काही लोकांच्या सपोर्टमुळे हाके मराठा समाजाला आडवा येण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यापुढे मराठा समाजाला आडवे येणाऱ्याला मराठा समाज आडवे करेल असा इशारा मराठा समाजाकडून यावेळी देण्यात आलाय.
यावेळी सकल मराठा समाज समन्वयक माऊली पवार, राजन जाधव, प्रा. गणेश देशमुख, महादेव गवळी, चंद्रकांत पवार, वामन वाघचौर, विष्णू जगताप, शाम गांगुर्डे, संदीप काशीद, लहू गायकवाड, दादा गांगुर्डे, ईश्वर अहिरे, बाळासाहेब घुले, विजय घुले, नागनाथ पवार, बाळासाहेब पवार आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट – कारण नसताना मराठा समाजाची, छत्रपती संभाजी राजे व मनोज जरांगे पाटलांची बदनामी केली. त्यामुळे आम्ही मराठा समजाच्या वतीने दारुड्या लक्ष्मण हाकेचा निषेध करत आहोत. लक्ष्मण हाकेंच्या माघे सरकार आहे. काल ज्या मराठा बांधवांवर खोटे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या माघे मराठा समाज पूर्ण ताकतीने उभा आहे.
⁃ माऊली पवार, सकल मराठा समाज
तुम्ही खरच प्रामाणिकपणे ओबीसी समाजासाठी उपोषण केलं का? असा सवाल मराठा बांधवांनी उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले, मनोज जरांगे पाटलांनी जे उपोषण केलं त्यानंतर ही जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर च्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे. आणि तुम्ही उपोषण संपलेल्या दुसऱ्यादिवशी दारू प्यायला बसता, मटनाची हाड खाता. तुम्ही खऱ्या अर्थाने प्रामाणिक उपोषण करता आहात का हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.
– प्रा. गणेश देशमुख, सकल मराठा समाज