सोलापूर – चंद्रपूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर सोलापुरात भाजप आक्रमक, सोलापुरातील कन्ना चौक परिसरात काँग्रेस विरोधात भाजपच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी हा युवक काँग्रेसचा पदाधिकारी असल्याने काँग्रेस गप्प असल्याचा भाजपचा आरोप करत. बदलापूर प्रकरणात काँग्रेसने राजकारण केले मात्र चंद्रपूर प्रकरणात मात्र कोणीही बोलत नाही असा आरोप भाजपा पदाधिकऱ्यांनी केला आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्ष डॉ किरण देशमुख, प्रदेश सरचिटणीस वृषाली चालुक्य, प्रदेश सचिव अजित कुलथे व भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहराचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट –
खा. प्रणिती शिंदे आणि काँग्रेसची भूमिका ही दुतोंडी गांडूळसारखी आहे, भाजप पदाधिकाऱ्यांची टीका
बदलापूर येथील दुर्दैवी घटना जेव्हा घडली तेव्हा महाविकास आघाडी आणि त्यांच्या नेत्यांनी राज्यभर त्याचा नुसता वनवा पेटवला होता, काँग्रेसच्या नेत्यांनी तर रस्त्यावरच न्यायनिवाडा करण्याची भाषा केली होती. बदलापूरच्या घटनेवर तर का ंग्रेस पक्ष आणि पक्षाचे नेत्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महायुतीच्या सरकारला निस्तेज सरकार आहे अशी टीका केली होती.
पण चंद्रपूर येथे एका काँग्रेसच्या नेत्यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांची भूमिका पुढे आली नाही, का ंग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे नेते, मूग गिळून गप्प बसले आहेत. खासकरून खासदार प्रणिती शिंदे यांची भूमिका ही गांडूळा सारखी आहे, असं म्हणत भाजप प्रदेश सरचिटणीस वृषाली चालुक्य यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले.