Manoj Jarange Patil | लाडक्या बहिणींना आणायला गेलेल्या बस ला मराठा बांधवांनी रिकामीच पाठवून सरकारचा निषेध व्यक्त केला.
सोलापूर –
देगाव तालुका मोहोळ येथून सर्व गावकरी बांधवांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या लाडकी बहीण कार्यक्रमास जी बस पाठवली होती ती बस गावातील लाडक्या बहिणींनी लाडका भाऊ संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून रिकामी पाठवून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे..!
विशेष म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गावातील सर्व समाज बांधवांनी मराठा समाजाला पाठिंबा म्हणून सर्व जातीधर्माचे बांधव मोठ्या संख्येने लाडकी बहीण कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. एक ही महिला कोणत्याच समाजाची त्या बसमध्ये बसून गेलेली नाही. त्यांनी देखील सरकारचा निषेध व्यक्त केला.