सोलापूर – सोलापूर शहरातील केवळ उत्तरच नव्हे तर तीनही मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं पुन्हा एकदा दावा सांगितला आहे. आज शहर राष्ट्रवादी – काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पत्रकार परिषद झाली. यात शहराची तब्बल १०२ सदस्य असलेली कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांची मुलाखती झाल्या आहेत. शहर उत्तर मधून । महेश कोठेमनोहर सपाटे या दोन्ही माजी महापौरांनी उमेदवारी मागितली आहेदक्षिण सोलापूर मधून धर्मराज काडादी, संतोष पवार आणि सुनीता रोटे. शहर मध्य मधून तौफिक शेख, प्रमोद गायकवाड, यू.एन बेरिया यांनी उमेदवारी वंदना भिसे आणि माजी महापौर मागितली आहे.
१०२ जणांची कार्यकारणी जाहिर
आज पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी सविस्तर माहिती दिली. नव्या कार्यकारणीमध्ये शहरातील तीनही मतदार संघासाठी प्रत्येकी ३ असे एकंदर ९ प्रांतिक सदस्य आहेत. तर ३ जनरल सेक्रेटरी. १ खजिनदार. तब्बल ३१ उपाध्यक्ष, १९ शहर सरचिटणीस, १७ चिटणीस, १० कार्यकारणी सदस्य आणि १२ कायम निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष एक संघ आहे कोणतेही मतभेद नाहीत. पक्षाकडे युवकांचा ओघ अधिक आहे असेही खरटमल म्हणाले. पत्रकार परिषदेस यू एन बेरिया मनोहर सपाटे, भारत जाधव, जनार्दन कारमपुरी, रवी पाटील, प्रशांत बाबर, महेश कोठे, चंद्रकांत पवार, शंकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी शरद पवार गट – विधान सभा इच्छुक उमेदवार
शहर उत्तर
१ महेश कोठे
२ मनोहर सपाटे
शहर मध्य
१ तौफिक शेख
२ प्रमोद गायकवाड
३ वंदना भिसे
४ यू. एन. बेरिया
दक्षिण सोलापूर
१ धर्मराज काडादी
२ संतोष पवार
मोहोळ
१ सुशीला आबूटे