सोलापूर – येथील ग्रामदेवी रूपाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवात बुधवारी सातव्या माळेला विविध प्रकारच्या भाज्यांची आरास करण्यात आली होती. सकाळी नित्योपचार पूजा, आरती झाल्यानंतर ११ वाजल्यापासून देवीच्या या रूपाचे दिवसभर हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.
पार्वतीचे रूप म्हणजे श्री रुपाभवानी देवी. देवीचे हे रूप अत्यंत मनमोहक आहे. बुधवारी, सकाळी नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजा झाल्यानंतर महापूजा करण्यात आली. दररोज नियमित रुपाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधिवत पार पाडले जात आहे.
आहेत. १० ऑक्टोबर रोजी अस्टमी व नवमी एकाच दिवशी आले आहे. यादिवशी श्री देवीची अलंकार पूजा आणि संध्याकाळी होमहवन होऊन रात्री नित्योपचार पूजा व छबिना होणार असल्याचे ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे यांनी सांगितले.