सोलापूर – कोजागिरी आणि मंदिर पौर्णिमा यानिमित्त तुळजापूरकडे पायी चालत जाणाऱ्या भाविकांची गर्दी होऊन कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामूळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याचे आदेश सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी यांनी दिले आहेत.
सोलापूर शहर, जिल्ह्यातील, कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात तुळजापूरकडे पायी चालत जात असल्याने वाहतुकीची कोंडी होवू नये, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी भाविक पायी चालत जाणारे मार्गावरील वाहने अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहेत.
भाविकांचे सुरक्षिततेच्या कारणावरुन खालीलप्रमाणे वाहतुक मार्गात बदल करण्यात आले आहेत. 14 ऑक्टोबर 2022 रोजीपासून 17ऑक्टोबर 2024 रोजीचे 24 वा. दरम्यान खालील मार्गावरून पथक्रमण करण्यास अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून सर्व प्रकारच्या वाहनास मनाई करण्यात येत आहे.
पथक्रमण करण्यास मनाई करण्यात आलेले मार्ग-
तुळजापूर ते सोलापूरकडे येणाऱ्या वाहतुकीस तुळजापूर, तामलवाडी, सोलापूर या दरम्यान पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे.
सोलापूर ते तुळजापूर कडे जाणाऱ्या वाहतुकीस सोलापूर, तामलवाडी, तुळजापूर या दरम्यान पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे.
तुळजापूर ते बार्शीकडे येणाऱ्या वाहतुकीस तुळजापूर, ढेकरी, गौडगाव, बार्शी या दरम्यान पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे.
बार्शी ते तुळजापूर कडे जाणाऱ्या वाहतुकीस बार्शी, गौडगाव, ढेकरी, तुळजापूर या दरम्यान पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे.
या मार्गावरील वाहने खालीलप्रमाणे मार्गक्रमण करतील –
तुळजापूर ते सोलापूरकडे येणारी वाहतुक मंगरूळपाटी, इटकळ, बोरामणी पुढे सोलापूर या मार्गे पथक्रमण करतील. सोलापूर ते तुळजापूर कडे जाणारी वाहतुक सोलापूर पासुन बोरामणी, इटकळ, मंगरूळपाटी पुढे तुळजापूर या मार्गे पथक्रमण करतील.
तुळजापूर ते बार्शीकडे जाणारी वाहतुक तुळजापूर, धाराशिव, वैराग पुढे बार्शी या मार्गे पथक्रमण करतील.
बार्शी ते तुळजापूर कडे जाणारी वाहतुक बार्शी, वैराग, धाराशिव पुढे तुळजापूर या मार्गे पथक्रमण करतील.
धाराशिव ते सोलापूर कडे येणारी वाहतुक वैराग मार्गे पथक्रमण करतील.सोलापूर ते धाराशिव कडे जाणारी वाहतुक वैराग मार्गे पथक्रमण करतील.
अत्यावश्यक वाहनांना बंदी नाही
पोलीस, रुग्ण सेवा, अग्निशमन दलाचे वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच एस. टी. बसेस या वाहनांना ही बंधने लागू राहणार नाहीत.14 ऑक्टोबर 2024 रोजीपासून 17 ऑक्टोबर 2024 रोजीचे 24 वा. दरम्यान तुळजापूर घाट हा सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद असणार आहे, याबाबतचे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जाहीर केले आहेत.
• तुळजापूर ते सोलापूरकडे येणाऱ्या वाहतुकीस तुळजापूर, तामलवाडी, सोलापूर यादरम्यान मनाई.
सोलापूर ते तुळजापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीस सोलापूर, तामलवाडी, तुळजापूर यादरम्यान मनाई.
• तुळजापूर ते बार्शीकडे येणाऱ्या वाहतुकीस तुळजापूर, ढेकरी, गौडगाव, बार्शी यादरम्यान मनाई.
बार्शी ते तुळजापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीस बार्शी, गौडगाव, ढेकरी, तुळजापूर यादरम्यान मनाई.
वरिल मार्गावरील वाहनं खालील मार्गावरून धावतील
तुळजापूर ते सोलापूरकडे येणारी वाहतूक मंगरूळपाटी, इटकळ, बोरामणी पुढे सोलापूर या मार्गे जाईल.
• सोलापूर ते तुळजापूरकडे जाणारी वाहतूक सोलापूरपासून बोरामणी, इटकळ, मंगरूळपाटीहून पुढे तुळजापूर या मार्गे जाईल.
• तुळजापूर ते बार्शीकडे जाणारी वाहतूक तुळजापूर, धाराशिव, वैराग पुढे बार्शी या मार्गे जाईल.
• बार्शी ते तुळजापूरकडे जाणारी वाहतूक बार्शी, वैराग, धाराशिव पुढे तुळजापूर या मार्गे जाईल.
• धाराशिव ते सोलापूरकडे येणारी वाहतूक वैरागमार्गे जाईल.
• सोलापूर ते धाराशिव कडे जाणारी वाहतूक वैरागमार्गे जाईल.