सोलापूर- राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते मोहोळचे उमेश पाटील यांनी आज पुण्यात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली असून शरद त्यांचा पवार पक्षात प्रवेश होवू शकतो अशी शक्यता आहे.
उमेश पाटील यांनी प्रवक्तेपदाचा यापूर्वीच राजिनामा दिला आहे. उमेश पाटील यांच्या प्रमाणेच आज अजित पवार गटाचे आ. राजेंद्र शिंगणे, अतुल बेनके पुण्याचे विलास लोंडे हे नेतेही शरद भेट पवारांना भेटलेत. यांचाही त्यांच्या पक्षात प्रवेश होवू शकतो. एकंदरीत हे अजित पवार गटाला शरद पवार गटाकडून हादरे बसत आहेत