राष्ट्रीय पेयजल योजनेचे 28 लाख पाण्यात घालणाऱ्या ठेकेदार, अधिकाऱ्यावर कारवाईची ग्रामस्थांकडून मागणी
सोलापूर – मोहोळ तालुक्यातील हराळवाडी ग्रामस्थांवर मागील तीन महिन्यापासून पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायतची बोर जळाल्याने आभाळ वृद्धांची पाण्यासाठी परवड होतेय.जिथं पाणीच मिळत नाही आशा गावात राहावं तर कशासाठी म्हणत महिलांच्या डोळ्यात अश्रू आलेत. त्यामुळे ग्रामस्थांनी आता विधानसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय.
जेमतेम 3 हजार लोकसंख्या असलेल्या हराळवाडी गावात पाण्याचा ठोस सोर्स नाही. ग्रामपंचायतीसमोर असणाऱ्या बोरवर गावकऱ्यांची पाण्याची भीस्त अवलंबून आहे.मागील वर्षी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या दुरुस्तीसाठी आलेल्या 28 लाख रुपयातून गायरान जमिनीतून नवीन पाईप लाईन टाकून ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवून गरजेचे होते.मात्र ठेकेदाराने अधिकाऱ्यांनी संगणमत करत जुन्याच पाणीपुरवठा पाईपलाईन ची दुरुस्ती केली. जागोजागी या पाईपलाईनला गळती लागल्याने ही योजना सध्या बंद आहे. मागील तीन महिन्यापूर्वी ग्रामपंचायत समोर असलेला बोरवेल जळाल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी चक्क तीन ते चार किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.
एकाच बोअरवर संपूर्ण गावाचा लोड असल्याने नेहमीच ग्रामपंचायती समोर असलेली बोरवेल जळत असते. वारंवार ग्रामस्थ स्वखर्चातून या बोरवेलची दुरुस्ती करत असतात. ग्रामस्थांनाच बोअर दुरुस्ती चा खर्च करावा लागत असेल तर पाणीपट्टी, घरपट्टी, नळपट्टी आकारताच कशाला ? त्यामुळे अशा गावात राहण्याचा उपयोगच काय ? असं म्हणत चक्क महिलांनी डोळ्यात पाणी काढलं. तर तरुणांनी पाण्याचा प्रश्न न सोडवल्यास विधानसभेला समस्त ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार घालतील असा इशारा दिलाय.
कोट –
” गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याचे पाणी नाही सरपंच,ग्रामसेवक,गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वारंवार पाण्याविषय बोललो पण त्यांच्याकडून टाळाटाळ होत आहे.”
पै.सिध्दू माने ग्रामस्थ हराळवाडी
“पाण्यासाठी ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे आणि वरिष्ठ अधिकारी ग्रामपंचायतीची पाठ राखन करीत आहे त्यामुळे पिण्याचे पाणी मिळत नाही येणाऱ्या विधान सभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा आम्ही सर्व ग्रामस्थ घेत आहोत.”
कैलास ऐवळे, ग्रामपंचायत सदस्य हराळवाडी
” पिण्याच्या पाण्यासाठी गावात एकच बोरवेल आहे तोही दोन महिन्यांपासून बंद आहे त्यामुळे गावातील जेष्ठ नागरिक,वृध्द महिला लहान मुले शाळेतील विद्यार्थ्यांसह नागरिकांना दोन तीन किलोमीटर अंतरावर पाण्यासाठी वणवण भंटकत करण्याची वेळ आली आहे.शासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.”
पै.माऊली हेगडे, सामाजिक कार्यकर्ते