सोलापूर – अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कडून राज्यातील लोकसभा क्षेत्राकरिता विधानसभा निवडणुकी करता संघटनात्मक कामकाजाकरीता माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ यांची निरीक्षक तर समन्वयक पदी अँड केशव इंगळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आज रोजी निरीक्षक कृष्णा तीरथ यांच्या सूचनेनुसार शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार यांनी काँग्रेस भवन सोलापूर येथे बैठक आयोजित केली होती.
यावेळी कृष्णा तीरथ मार्गदर्शनपर बोलताना म्हणाले.की, सोलापूर लोकसभा क्षेत्रातील बुथ कमिटी, प्रभाग निहाय कामकाज, पोलिंग बूथ, काँग्रेस, महाविकास आघाडी व मित्र पक्षाचा उमेदवाराचा प्रचार, ब्लॉकनिहाय कामकाज, ग्रामीण व शहरात बुथनिहाय बूथ लेवल एजंट यांची ट्रेनिंग घेणे, तसेच अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जी, विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नीथला, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने आज पर्यंत केलेले कामकाज निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर घेऊन जाऊन काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याविषयी संपूर्ण शहर व जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते प्रयत्न करावे असे आवाहन केले.
या बैठकीस शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, संजय हेमगड्डी, रियाज हुंडेकरी, आरिफ शेख, शिवा बाटलीवाला, आरिफ शेख, अलकाताई राठोड, देवेंद्र भंडारे, नरसिंग कोळी, अंबादास बाबा करगुळे, गणेश डोंगरे, फिरदौस पटेल, वैष्णवीताई करगुळे, अनुराधा काटकर आदी उपस्थित होते.
चौकट – सोलापुरातील पत्रकार परिषदेवेळी बोलताना त्या म्हणाल्या देश वाचविण्यासाठी काँग्रेस सत्तेत येणे खूप गरजेचे आहे. आमची सत्ता आल्यावर आम्ही शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण व सर्वांना समान आधिकार देण्याचा प्रयत्न करू. जाती, धर्म, प्रांत, भाषा या नावाने देशाला तोडण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. देशाचे संविधान वाचविणे ही आमची जबाबदारी आहे. हे दोन महारथी तर देश विकायला निघाले आहे. अशी टीका माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ यांनी केली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या हरियाणातील चुका महाराष्ट्रात होऊ देणार नाही. निवडणुकांमध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचा शक्यतो दौरा असल्याची माहिती दिली.