सोलापूर
तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आमदार सुभाष देशमुख यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन…
दुबदुबी तलावात पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने शिरवळ येथे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुबदुबी तलावात पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी जवळपास दहा गावातील ग्रामस्थांचे शिरवळ येथे ठिय्या आंदोलन सुरू आहे.
या आंदोलन ठिकाणी भेट देऊन परत जाताना भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला.
वरील दोन तलावातून थोड्या प्रेशरने पाणी सोडलं तर दुबदुबी तलावात पाणी येऊ शकतं.दहा दिवसात या तलावात पाणी येईल असे आमदार देशमुख यांनी ग्रामस्थांना आश्वासित केले आहे.
त्यामुळे तुम्ही सीई किंवा एसी ला बोलून पाणी सोडण्याबाबत सांगावे. अशी विनंती सुभाष देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांना केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.