सोलापूर
विजयकुमार देशमुख यांनी चार टर्ममध्ये चार कामे केलेली सांगावे…
सोलापूर शहर उत्तर मतदार संघातून महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे हे आज शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करत आहेत. लिंगायत समाजाचा बालेकिल्ला असलेल्या कसबा येथे महेश कोटी यांनी गणपतीचे दर्शन दर्शन घेत आशीर्वाद घेतलाय. यावेळी बोलताना त्यांनी चार टर्म आमदार राहिलेल्या विजयकुमार देशमुख यांच्यावर हल्लाबोल केलाय.
विजयकुमार देशमुख यांनी जाती-जातीत धर्माधर्मात भांडणे लावले. इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळावे. सोलापुरात आयटी पार्क व्हावा यासाठी आपण प्रयत्न करत असून मागील चार टर्ममध्ये विजयकुमार देशमुख यांनी केलेली चार कामे सांगावी असं आव्हानच महेश कोठे यांनी विजयकुमार देशमुख यांना दिले आहे.